संगमनेर: वीजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू
Breaking News | Sangamner: शेतीमध्ये पाणी भरण्याचे काम करत असतांना अचानक वीजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू.
संगमनेर : शेतीमध्ये पाणी भरण्याचे काम करत असतांना अचानक वीजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील दरेवाडी येथे सोमवार रात्री घडली.
सुजल धोंडीबा गायकवाड (वय.१९) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीमध्ये पाणी भरण्याचे काम करत असतांना अचानक वीजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुजल हा आई-वडील, दोन बहिणींसोबत रहात होता. सोमवारी रात्री आपल्या शेतीला पाणी देत असतांना वीजेचा तीव्र धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Youth dies due to electric shock
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study