Home Sangamner News Accident: संगमनेर खुर्द शिवारात अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident: संगमनेर खुर्द शिवारात अपघातात तरुणाचा मृत्यू

Youth dies in accident at Sangamner Khurd

संगमनेर | Accident: संगमनेर खुर्द शिवारात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मालट्रकला समोरून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

कृष्णा सुभाष करपे वय २८ रा. कुंभार आळा संगमनेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास घडला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा करपे हा डेकोरेटरचा काम करीत होता. संगमनेर शिवारातील कुबेर लोन्स येथे सोमवारी सायंकाळी एका कार्यक्रमाची ऑर्डरचे काम करण्यसाठी गेला होता.  रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कामकाज आटोपून आपल्या स्विफ्ट कारमधून घरी येत असताना संगमनेर खुर्द शिवारातील संगमनेरकडे वळण घेत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो समोरून येणाऱ्या मालट्रकवर जाऊन आदळला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला बाहेर काढत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.  

Web Title: Youth dies in accident at Sangamner Khurd  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here