Home नाशिक रिक्षा चालवणाऱ्या एका युवकाचा दगडाने ठेचून खून, अनैतिक संबंधातून हत्येचा..

रिक्षा चालवणाऱ्या एका युवकाचा दगडाने ठेचून खून, अनैतिक संबंधातून हत्येचा..

Breaking News | Nashik Crime: अनैतिक संबंधातून हत्येचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.

youth driving a rickshaw was stoned to death, murder due to immoral relationship

नाशिक: शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालवणाऱ्या एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. पंचवटी मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्सजवळील मोकळ्या पटांगणात रविवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास प्रशांत अशोक तोडकर (वय २८, रा. आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) याचा मृतदेह आढळून आला. त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूला दारूच्या बाटल्या, ग्लास आणि दगडही आढळून आले आहेत. अनैतिक संबंधातून या युवकाची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, योगेश अशोक तोडकर (वय ३४, व्हेकरे चाळ, आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामवाडी आदर्शनगर येथील प्रशांत अशोक तोडकर हा सीबीएस ते पंचवटी म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. दररोज व्यवसायासाठी जाणारा प्रशांत शनिवारी (दि. १५) दिवसभर घरीच होता. मात्र, सायंकाळी तो रिक्षा घेऊन गेल्यानंतर रविवारी (दि. १६) सकाळी त्याचा मृतदेह आरटीओ कॉर्नर रासबिहारी लिंक रोडवर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती प्रशांतचे बंधू योगेश तोडकर यांना कळविण्यात आली, तसेच पोलीस उपायक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गुन्हे शाखा

युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी प्रशांतची रिक्षा (क्र. (एमएच १५ ईएच ३५१७) व आजूबाजूला दारूच्या बाटल्या, ग्लास आढळून आले. हा खून मद्यपान करताना किंवा त्यानंतर झाल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने तोडकर परिवार हादरला असून, रामवाडी परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

Web Title: youth driving a rickshaw was stoned to death, murder due to immoral relationship

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here