Home पुणे आंतरधर्मीय विवाह केल्याने तरूणाची हत्या,  ‘सैराट’ची पुनरावृत्ती

आंतरधर्मीय विवाह केल्याने तरूणाची हत्या,  ‘सैराट’ची पुनरावृत्ती

Breaking News | Pune Crime: एका साडूने आपल्या साडूचीच हत्या केल्याचा प्रकार समोर. ऑनर किलिंगचा प्रकार आला समोर.

Youth killed for interfaith marriage, 'Sairat' repeats

पुणे: आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह आणि त्यातून घडणाऱ्या हत्येच्या घटना समाजात वाढत आहेत. पिंपरी चिंचवड शहर एका अशाच हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. एका साडूने आपल्या साडूचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकले. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती मिळतं आहे. या प्रकरणात अमीर शेख या 25 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत अमीर शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव याच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने हे कृत्य केलं.

या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींच्या विरोधात भादवि कलम 364, 302, 201, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे.

Web Title: Youth killed for interfaith marriage, ‘Sairat’ repeats

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here