संगमनेर: स्कूल बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू
Breaking News | Sangamner: स्कूल बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: स्कूल बसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी नाशिक शहरातील सिडको परिसरात त्रिमूर्ती चौकात घडली. मयूर दत्ता गुंजाळ (वय १८ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अंबड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर दत्ता गुंजाळ हा त्याच्याकडील इलेक्ट्रिक दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सिटीसेंटर मॉलकडे जात असतांना गोलीवडाजवळ एका स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मयूरला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सदर अपघाताची माहिती तात्काळ अंबड पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघात स्थळाची पाहणी केली. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाती मृत्यू पावलेल्या मुलाचे वडील दत्ता गुंजाळ हे मूळचे संगमनेर खुर्द येथील रहिवाशी असून नोकरी निमित्ताने ते नाशिकस्थित आहे. दादासाहेब भीमाशंकर गुंजाळ, अण्णासाहेब भीमाशंकर गुंजाळ व संगमनेर पंचायत समितीच्या माजी सदस्य रोहिणीताई गुंजाळ यांचा मयूर हा पुतण्या आहे. या घटनेने संगमनेरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: youth on a two-wheeler died on the spot after being hit by a school bus
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study