Home पुणे पोलीस चौकीसमोर तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं; धक्कादायक कारण आलं समोर

पोलीस चौकीसमोर तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं; धक्कादायक कारण आलं समोर

Breaking News | Pune Crime: तरुणाने पोलीस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतलंय.

youth set himself on fire in front of the police post

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पोलीस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतल्याच्या  विचित्र घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण राहत असलेल्या ठिकाणी तेथील अन्य व्यक्तींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. त्या व्यक्तींशी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे वाद सुरू होते. अशात त्याच व्यक्तींकडून काही दिवसांपूर्वी त्याला मारहाण झाली. झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला. रोहिदासने संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारवाईला होत असलेला उशिर पाहून रोहिदास आणखी संतापला आणि हताश झाला.

यातच मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर त्याने स्वतःला पेटून घेतलं. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: youth set himself on fire in front of the police post

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here