Home संगमनेर संगमनेरात युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करत दुचाकी जाळली

संगमनेरात युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करत दुचाकी जाळली

Breaking News | Sangamner Crime:  दुचाकीवरून घरी जाणाऱ्या २७ वर्षीय युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करत त्याची दुचाकी जाळून टाकल्याची घटना.

youth was beaten with an iron rod and the bike was burnt

संगमनेर : दुचाकीवरून घरी जाणाऱ्या २७ वर्षीय युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करत त्याची दुचाकी जाळून  टाकल्याची घटना गुरुवारी – (दि. २०) रात्री ११:०० वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात  घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक कैलास लष्करे (वय २७, धंदा वाहनचालक, रा. निमज विद्यानगर,  ता. संगमनेर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.त्याने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून राहुल सोनवणे (रा. अकोले नाका, संगमनेर) आणि दोन अनोळखी इसम अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की,  अशोक लष्करे हा युवक अकोले नाका येथून घरी जात असताना राहुल सोनवणे व दोन अनोळखी इसमांनी त्याला ‘गाडी साईडला घे’ असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर लष्करे याची यामाह कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल (एमएच १५ एवाय ४७२०) ही गाडी जाळून टाकली. असेही फिर्यादीत नमूद आहे. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हासे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: youth was beaten with an iron rod and the bike was burnt

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here