Home क्राईम अपहरण करून युवकाचा खून, मृतदेह पुरला  

अपहरण करून युवकाचा खून, मृतदेह पुरला  

Crime News: खून (Murder) केल्यानंतर संशयितांनी युवकाचा मृतदेह एका निर्जनस्थळी खड्ड्यात पुरून ठेवल्याचीही बाब छळ करीत होता म्हणून काढला काटा; आठ संशयित गजाआड.

youth was kidnapped and Murder, the body was buried

वणी: दारूचे व्यसन, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाकडून सततची होणारी पैशांची मागणी, शिवीगाळ व दहशत या त्रासाला कंटाळून नऊ संशयितांनी संगनमत करून ‘त्या’ युवकाचा खून केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर संशयितांनी युवकाचा मृतदेह एका निर्जनस्थळी खड्ड्यात पुरून ठेवल्याचीही बाब पोलीस तपासात पुढे आली आहे.

याप्रकरणी वणी पोलिसांनी शिताफीने केलेल्या तपासात नऊ संशयितांची नावे समोर आली आहेत. यापैकी सात जणांना अटक केली असून, एक विधिसंघर्षित बालक, तर एक जण फरार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांजुळे येथील युवक हरिश्चंद्र कचरू शेवरे उर्फ हऱ्या (वय ३६) हा १४ डिसेंबर रोजी हरवल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून काही संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी पोलिसांना कबुली देताना सांगितले की, वांजुळे गावातील हरिश्चंद्र शेवरे हा जबरदस्तीने पैशांची मागणी करायचा, तसेच पैसे न दिल्यास शिवीगाळ व धमकी द्यायचा. त्याचा त्रास सहन न झाल्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे छगन गांगोडे याने हरिश्चंद्र शेवरे यास दुचाकीवर बसवून टिटवे गावच्या पुलाजवळ आणले. येथे आधीच येऊन थांबलेल्याअन्य संशयितांनी हरिश्चंद्र शेवरे यास लाठ्याकाठ्या व हत्यारांनी मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह वारे ते तळ्याच्या पाड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या खाली एका ओहळाच्या खड्यात पुरल्याचे पोलिसांना सांगितले.

ही सगळीमाहिती घेऊन पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले, तर एक संशयित विधीसंघर्षित असून, दुसरा संशयित फरार आहे. अशाप्रकारे या गुन्ह्यात एकूण नऊ संशयितांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, हरिश्चंद्र शेवरे याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.

असा लावला छडा

 टिटवे येथे हरिश्चंद्र शेवरे याचे काही तरुणांसोबत भांडण झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती; परंतु त्याबाबत गावात वाच्यता कुठेच होत नव्हती. गावातील कोणीच काही सांगायला तयार नव्हते. मात्र, पोलीस तपासात प्रारंभी एकाचे नाव पुढे आले. नंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. सुरुवातीला संशयितांच्या घरी चौकशी केली असता ते घरी मिळून आले नाही. अखेर पोलिसांनी संशयितांचा मोबाइल क्रमांक शोधून तांत्रिक तपासावरून चार संशयितांना दिव-दमण येथून ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच चौघाही संशयितांनी घटनाक्रम सांगायला सुरुवात केली.

Web Title: youth was kidnapped and Murder, the body was buried

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here