Home जालना अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा चाकूने खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा चाकूने खून

Breaking News | Jalna Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा चाकूने वार करत खून करण्यात आल्याची घटना.

youth was stabbed to death on suspicion of having an immoral relationship

जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा चाकूने वार करत खून करण्यात आला. कलिम शेख खाजा शेख (वय 30) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर तीन जण फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या महिलेसोबत कलिम शेखचे अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. यामुळे पतीसह त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक कलिमवर पाळत ठेऊन होते.

शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कलिमला एकटा गाठत सरफराज फेरोज शेख आणि अन्य तिघांनी त्याच्यावर चाकूने वार केला. यात जखमी झालेल्या कलिमला जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरफराज शेख यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे तर तिघे पसार आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: youth was stabbed to death on suspicion of having an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here