Home अहमदनगर अहमदनगर: गोळीबाराची खोटी माहिती देणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर: गोळीबाराची खोटी माहिती देणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: ‘एके ४७ बंदुकीतून गोळीबार झाला,’ अशी खोटी माहिती देवून पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.

youth who gave false information about the firing

राहुरी : नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी असलेला फोनचा ११२ क्रमांक डायल करुन, ‘एके ४७ बंदुकीतून गोळीबार झाला,’ अशी खोटी माहिती देवून पोलिस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन, कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तालुक्यातील घोरपडवाडी येथील महेश बाळासाहेब घाडगे (३३) याच्याविरोधात पोलिस नाईक प्रविण आहिरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, ११२ क्रमांकाचा गैरवापर केल्यास पोलिस कठोर कारवाई करतात. पोलिसांना विनाकारण खोटी माहिती देत फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पो. नि. संजय ठेंगे यांनी केले आहे. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये एकाने १३ जून रोजी रात्री १.३० वाजता फोन करुन, अनिल देशमुख नावाची व्यक्ती बंदूक दाखवित आहे. माझ्यावर एके ४७ बंदूकीतून गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या हाताला गोळी चिटकून गेली, अशी गोळीबार केल्याची माहिती तरुणाने दिली होती. याप्रकरणी तत्काळ दखल घेत पो. नि. संजय ठेंगेंसह पो. उ.नि. आसिफ शेख, पो. हवालदार प्रविण अहिरे, लक्ष्मण खेडकर, जालिंदार साखरे यांचे पथक घोरपपडवाडी येथे दाखल झाले होते, मात्र तसा प्रकार न आढळल्याने पोलिसांनी संबंधिताशी संपर्क साधला,

परंतू त्या तरूणाने पुन्हा उडवा- उडवीची उत्तरे देत पोलिसांना गोंधळात टाकले. रात्रभर वेळोवेळी ११२ क्रमांकावर संपर्क करुन, तो पोलिसांची दिशाभूल करीत होता. अखेर त्रालेल्या पोलिसांनी गुप्त खबऱ्यासह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. या गुन्ह्याचा तपास पो. हवालदार गणेश सानप करीत आहे.

याप्रकरणाबाबत पो.नि. ठेंगे म्हणाले, नागरीकांची सुरक्षा व वेळ प्रसंगी पोलिसांची तातडीने मदत मिळावी म्हणून ११२ क्रमांकाची सूविधा देण्यात आली आहे, परंतू विनाकारण या क्रमांकाचा गैरवापर करुन, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.

Web Title: youth who gave false information about the firing

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here