Home क्रीडा युसूफ पठाणच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाचा दणदणीत विजय

युसूफ पठाणच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाचा दणदणीत विजय

Yusuf Pathan

Legends League Cricket : गुरुवार पासून ओमन देशात सुरू झालेल्या नव्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील सामना खेळवण्यात आला. ‘लिजेन्ड्स क्रिकेट लीग’ अशी ही टी-20 स्पर्धा असून स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात युसूफ पठाणच्या तुफान फलंदाजीचा जोरावर भारतीय संघाने विजयी सलामी दिली.

‘लिजेन्ड्स क्रिकेट लीग’ स्पर्धेचा पहिला हंगाम ओमान देशात खेळवला जात आहे. या स्पर्धेत जगभरातील निवृत्त खेळाडू एकत्र खेळताना दिसणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या हंगामात तीन संघ असून एकूण सात सामने खेळवले जाणार आहेत. इंडिया महाराजा (India Maharajah), एशिया लायन्स (Asia Lions) आणि वर्ल्ड जायंट्स (World Giants) असे तीन संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

इंडिया महाराजा हा फक्त भारतीय खेळाडूंचा संघ असून मोहमद कैफ (Mohammad Kaif) संघाचे नेतृत्व करीत आहे. तर एशिया लायन्स संघात श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा एक खेळाडु मिसबा उल हक च्या नेतृत्वाखाली सहभागी झाला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड जायंट्स संघात आशिया बाहेरील जगभरातील दिगग्ज खेळाडू असणार आहेत. या संघाचे नेतृत्व डेरेन सेमी (Darren Sammy) करताना दिसणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना भारताने जिंकला असून 29 जानेवारीला टॉप 2 टीम मध्ये अंतिम सामना रंगणार आहे.

काल झालेल्या लढतीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना एशिया लायन संघाने शानदार 175 धावा उभ्या केल्या. यात उपूल थारंगाने 66 तर मिसबाहने 44 धावा केल्या. पहिल्या डावात मणप्रित गोणीने3 तर इरफान पठाणने 2 गडी बाद केले. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुरुवातीलाच तीन विकेट्स गमावल्या. मात्र या नंतर आलेल्या युसूफ पठाणने तुफान फलंदाजी करीत 40 चेंडूत 80 धावा केल्या. तर कैफ ने नाबाद 42 धावा केल्या. दोघांमध्ये 117 धावांची बहुमूल्य भागीदारी झाली. मात्र डेथ ओव्हर्स मध्ये सामना पोहोचताच दुर्दैवाने धाव घेत असताना मोहम्मद कैफचे पायातील बूट निघाल्याने तो थांबला आणि युसूफ धावबाद झाला. यानंतर भारतीय संघाच्या हातून सामना निसटून जात असतानाच इरफान पठाण ने सलग फटकेबाजी करीत सामना जिंकवून दिला. स्पर्धेचा दुसरा सामना आज सायंकाळी एशिया लायन्स विरुद्ध वर्ल्डस जायंट्स संघात रंगणार आहे.

Web Title : Yusuf Pathan’s shot helped the Indian team to a resounding victory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here