Home संगमनेर संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर १ हजार किलो गोमांस जप्त

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर १ हजार किलो गोमांस जप्त

Breaking News | Ssngamner Crime: ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरोधात गुन्हा.

1,000 kg of beef seized on Nashik-Pune highway

संगमनेर : श्रीरामपूर येथून नाशिक पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून घारगाव पोलिसांनी १ हजार किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई रविवारी (दि.८) पहाटे तीनच्या सुमारास आंबी खालसा परिसरात करण्यात आली.

याप्रकरणी ईमाम हुसेन शेख (वय २८, रा. माडा चौक, कोकरियानगर, सायन कोळीवाडा, अँटॉप हिल मुंबई) व अजीम अन्सारी (रा. कसाईवाडा मस्जिदसमोर, ता. जुन्नर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, चालक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत मेढे हे घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पुण्याच्या दिशेने एमएच ४६ एक्स ६३०५ क्रमांकाची कार भरधाव जाताना दिसली.

पोलिसांनी कार अडवून तपासणी केली असता गोमांस आढळून आले. चालक ईमाम शेख यास ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारणा केली असता अजीम अन्सारी याच्या सांगण्यावरून ममदापूर (ता. श्रीरामपूर) येथून गोमांस घेतले असल्याचे शेख याने सांगितले. पोलिसांनी २ लाख रुपयांचे १ हजार किलो गोमांससह ३ लाख ५० हजार रुपयांची कार असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Breaking News: 1,000 kg of beef seized on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here