Home संगमनेर संगमनेर पालिकेसाठी १३ अर्ज दाखल, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या उमेदवार निवडीकडे सर्वांचे लक्ष

संगमनेर पालिकेसाठी १३ अर्ज दाखल, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या उमेदवार निवडीकडे सर्वांचे लक्ष

Breaking News | Sangamner Election: तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आत्तापर्यंत नगरसेवक पदासाठी वीस आणि नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला.

13 applications filed for Sangamner Municipality Election 

संगमनेर:  येथील पालिका निवडणुकीसाठी रविवारी (दि. १६) सुट्टीचा दिवस असतानाही आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी होती. त्यामुळे तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आत्तापर्यंत नगरसेवक पदासाठी वीस आणि नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. पंरतु, अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांकडून अर्ज न आल्याने मतदारांचे कुतूहल वाढले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार रविवारी सातवा दिवस होता. आता अवघा एक दिवस उरला आहे. तत्पूर्वी रविवारी प्रभाग क्रमांक १ (अ) मधून अश्विनी सतीष ढोले, प्रभाग ७ (ब) मधून प्रसाद ज्ञानदेव गोरे, प्रभाग क्रमांक ८ (ब) मधून असिफ इलियास शेख, प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून सायरा इलियास शेख, प्रभाग क्रमांक १० (अ) मधून कुरेशी हुरबानो गुलाम साबीर, फैरोजा इलियास शेख व दिलशाद अजीज शेख, प्रभाग क्रमांक १० (ब) मधून एजाज जमील इनामदार, प्रभाग

क्रमांक ११ (अ) मधून कुरेशी रशिदाबी अब्दुल करीम, प्रभाग क्रमांक ११ (ब) शेहबाज गफार शेख, प्रभाग क्रमांक १५ (अ) मोमीन जैद जुनेद, प्रभाग क्रमांक १५ (ब) दिलशाद अजीज शेख असे एकूण तेरा अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले. आता अवघा सोमवारचा दिवस उरला असून, सत्ताधारी व विरोधकांकडून कोणाला रिंगणात उतरवले जाते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Breaking News: 13 applications filed for Sangamner Municipality Election 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here