Home संगमनेर संगमनेर भयानक घटना! 15 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेत जाताना बिबट्याचा हल्ला

संगमनेर भयानक घटना! 15 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेत जाताना बिबट्याचा हल्ला

Breaking News | Sangamner student attacked by leopard: सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची भयानक घटना.

15-year-old student attacked by leopard on her way to school

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील डिग्रस अंभोरे रस्त्यावर सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची भयानक घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेला व गळ्याला खोल जखमा झाल्या आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला आणि मुलीचा जीव वाचला.

इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात होती. डिग्रस गावाजवळ रस्त्यालगतच्या शेतातील गिन्नी गवत व कपाशीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेला चावा घेऊन तिला फरफटत गवतात ओढून नेले.

यावेळी रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. नागरिकांच्या प्रतिकारामुळे बिबट्या घाबरून पळून गेला.

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या गळ्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने रक्तस्त्राव झाला. नागरिकांनी तिला तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुभाष धानापुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि भक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्याचे निर्देश दिले.

Breaking News: 15-year-old student attacked by leopard on her way to school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here