Home महाराष्ट्र प्रेमातून भयानक कृत्य, मुलीला जंगलात नेलं अन्…, २ महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक...

प्रेमातून भयानक कृत्य, मुलीला जंगलात नेलं अन्…, २ महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

minor girl murder love affair: प्रेम प्रकरणातून कुडाळमध्ये १७ वर्षांच्या मुलीची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर.

17-year-old girl brutally murdered in Kudal over love affair

 

कुडाळ: प्रेम प्रकरणातून कुडाळमध्ये १७ वर्षांच्या मुलीची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घावनळे गावातील दीक्षा २ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह जंगलात आढळलाय. दोन महिन्यापूर्वी दीक्षा घरातून अचानक गायब झाली होती. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात होता. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. जंगलातील शेतात नेहून तिचा गळा दाबल्याचं समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) येथील दोन ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा बागवे या अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस प्रशासनाने या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे. घावनळे गावातील ही मुलगी दोन ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलातील एका शेत मांगरात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची माहितीही समोर येत आहे. सध्या फॉरेन्सीक एक्स्पर्ट टीम घटनास्थळावर दाखल झाली असून अधीक तपास करण्यात येत आहे. पोलीसांनी आरोपी कुणाल कुंभार याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. १७ वर्षाच्या मुलीच्या हत्येने कुडाळ हादरलेय.

Breaking News: 17-year-old girl brutally murdered in Kudal over love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here