संगमनेर: 26 वर्षीय तरुणीवर दोघांचा अत्याचार, फोन करून बोलावले अन….
Breaking News | Sangamner: तालुक्याच्या पठार भागात एका 26 वर्षीय आदिवासी तरुणीवर दोघांनी अत्याचार केला.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागात एका 26 वर्षीय आदिवासी तरुणीवर दोघांनी अत्याचार केला आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठार भागातील पाणीपुरी विक्रेता गणेश प्रजापती याने घरी साफसफाईचे काम करण्यास 26 वर्षीय आदिवासी पीडित तरुणीला बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. यावरच तो थांबला नाही तर बेकरीवाला सैफुल्ला अबुतय्यब शेख याला देखील फोन करून बोलावून घेतले. त्यानेही पीडितेवर अत्याचार केला.
एका २६ वर्षीय विवाहित महिलेवर भेळ सेंटर चालक आणि बेकरी चालक या दोघांनी मिळून शारीरिक अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली होती. या प्रकरणी बुधवारी (दि.१) घारगाव पोलिस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. अत्याचार करणारे व्यवसाय करण्याकरिता घारगाव (ता. संगमनेर) येथे बाहेरून आले आहेत.
गणेश प्रजापती (हल्ली रा. घारगाव, ता. संगमनेर) आणि सैफुल्ला अबुतय्यब शेख (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची
तो विवाहितेला त्याच्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले.
नावे आहेत. पीडित महिला नातेवाइकांसोबत राहते. घारगाव येथे प्रजापती याचे भेळ सेंटर आणि शेख याची बेकरी आहे, त्यांची दुकाने अगदीच शेजारीशेजारी आहेत. १५ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता विवाहिता तिच्या भावासमवेत घारगाव येथील अकलापूर रस्त्यावरील
प्रजापती याच्या भेळ सेंटर येथे पाणीपुरी खाण्यासाठी गेली होती. तो विवाहितेला बोलला की, ‘तुझ्या भावाला माझ्याकडे पाणीपुरीच्या दुकानावर कामाला पाठव,’ त्यावेळी विवाहिता त्याला ‘नाही,’ म्हणाली. त्यानंतर, त्याने तिला ‘माझ्या घरी साफसफाईचे काम करणार का?’ असे विचारले असता, तिने त्याला काम करण्यासाठी होकार दिला.
त्यावेळी तो विवाहितेला त्याच्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर, प्रजापती याने बेकरी चालक शेख याला तेथे बोलावून घेतले. त्यानेही विवाहितेवर अत्याचार केले. याबद्दल कुणाला काही सांगितल्यास त्या दोघांनीही विवाहितेला मारून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अत्याचारासह अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहे. तर आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पथके रवाना केली आहे.
Breaking News: 26-year-old girl raped by two men