sangamner: स्वयंपाक करणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेवर अतिप्रसंग
Breaking News | Sangamner: २६ वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी अतिप्रसंग करणाऱ्याविरुद्ध घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
घारगाव : २६ वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी अतिप्रसंग करणाऱ्याविरुद्ध घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना तालुक्याच्या पठार भागातील एका गावात रविवारी (दि.१०) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. किसन देवराम गफले असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पीडित महिला तिच्या कुटुंबीयांसमवेत तालुक्याच्या ग्रामीण भागात राहते. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास महिला घरात स्वयंपाक करत होती, त्यावेळी गफले तिच्या घरात घुसला. त्याने तिचा हात ओढल्याने महिला घराबाहेर पळाली. त्याने महिलेशी अतिप्रसंग केला. याप्रकरणी सोमवारी (दि. ११) संध्याकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
Breaking News: 26-year-old married woman accused of cooking