पाचवीतील मुलीला वडिलांनी बोलावले सांगत तिला लॉजवर नेऊन बलात्कार
Pune Crime News: राजगुरूनगर हादरले! वडिलांनी बोलवलंय सांगून पाचवीतील मुलीला लॉजमध्ये नेऊन बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे: राजगुरूनगर येथे इयत्ता पाचवीतील मुलीची शाळा सुटल्यावर ती घरी जात असतांना काही नराधमांनी तिला तिच्या वडिलांनी बोलावले असे खोटे सांगत तिला आपल्या गाडीवर बसवून लॉजमध्ये नेट तिच्यावर अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजगुरूनगर (ता. खेड) जवळच्या राक्षेवाडीत घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक (Arrested) करण्यात आली आहेकल्याण सोनबा राक्षे (वय ४२, रा. राक्षेवाडी, ता.खेड) असे अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील व आरोपी हे मित्र होते. आरोपीचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे जाणे असे. आरोपीने तुला वडिलांनी बोलवले असे सांगून जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुलीला नेऊन लॉजवर अत्याचार करून पुन्हा शाळेत आणून सोडले.
मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने खेड पोलिसांत शुक्रवारी (दि २३) तक्रार दिली. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली. त्यांनी तातडीने पथक स्थापन करून आरोपीला अटक केली. शाळेतून अल्पवयीन मुलीला घेउन जाऊन अत्याचार झाल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच भर दिवसा ही घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Title: 5th class girl was called by her father and taken to the lodge and rape
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App















































