Home क्राईम संगमनेर: जागेच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी, आठ जणांविरुद्ध गुन्हा

संगमनेर: जागेच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी, आठ जणांविरुद्ध गुन्हा

Sangamner Crime:  जागेच्या वादातून  दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना.

Violent fight between two families due to land dispute, crime against eight people

संगमनेर: जागेच्या वादातून  दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना काल रात्री बारा वाजेच्या सुमारास शहरातील माधव थेटर जवळ घडली या हाणामारी पाच जण जखमी झाल्या असून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील माधव थेटर जवळ राहणार्‍या दोन कुटुंबामध्ये जागेचा जुना वाद आहे. त्यावरून बरेच दिवसापासून त्याच्यामध्ये भांडणे चालु आहेत. काल रात्री त्यांच्यामध्ये पुन्हा वाद  झाला, या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारी राहुल रावसाहेब थोरात, मिराबाई विनायक साठे, नितिन विनायक साठे, ओम नितिन साठे, हिराबाई रावसाहेब थोरात हे जखमी  झाले.

याबाबत राहुल रावसाहेब थोरात यांनी या फिर्यादीवरून पोलिसांनी भाऊसाहेब रंगनाथ आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड, करण भाऊसाहेब आव्हाड, अर्जुन भाऊसाहेब आव्हाड, कविता दिलीप आव्हाड, लक्ष्मीबाई रंगनाथ आव्हाड, रंगनाथ गंगाधर आव्हाड, सविता भाऊसाहेब आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 440/2024 भारतीय दंड संहिता कलम 143, 14, 148, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Violent fight between two families due to land dispute, crime against eight people

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here