मोठी बातमी! लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार? अजित पवारांनी सांगितली तारीख
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं.
लाडकी बहिण योजना: लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार? याबाबत विविध प्रश्न विचारले जात होते. आज मात्र, अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचेही अजित पवार यांनी केलं. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे.
सध्या पक्षात अनेकजण येत आहेत. पक्षाची बेरीज झाली पाहिजे. मात्र, पक्षाला कमीपणा यायला नको. जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. गैरवर्तणूक होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असंही अजित पवार म्हणाले.
Web Title: When will the money of the ladaki Bahin Yojana be collected
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News