अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून अत्याचार
Breaking News | Raped Case: जीवे मारण्याची धमकी, पीडित मुलीवर दोन ते तीन वेळस अत्याचार.
छत्रपती संभाजीनगर: मधून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असल्याच्या संधीचा फायदा घेत नराधमानं तीचं तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला आहे. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही घटना छत्रपती संभाजीनगमधील चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचं तोंड दाबून अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका नराधमाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केलं, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने पीडित मुलीवर दोन ते तीन वेळस अत्याचार केला. घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Breaking News: Minor girl raped by pressing her mouth