अकोलेत छापे टाकून एक लाखांपेक्षा जास्त किमतीची अवैध दारू जप्त
Breaking News | Akole raid: अवैध दारूवर एकाच महिन्यात तिसऱ्यांदा छापे टाकून एक लाखांपेक्षा जास्त किमतीची अवैध दारू जप्त.
अकोले: अकोले तालुक्यातील अवैध दारूवर एकाच महिन्यात तिसऱ्यांदा छापे टाकून एक लाखांपेक्षा जास्त किमतीची अवैध दारू जप्त केली. या पकरणी सात आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यात गेल्या महिनाभरात कोतूळ, राजूर, समशेरपूर या भागात तीन अवैध दारूविक्रीवर कारवाई झाल्या. या तिन्ही कारवाईत जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी निरीक्षक उत्पादन शुल्क संगमनेर, निरीक्षक कोपरगाव विभाग, निरीक्षक नेवासा विभाग, निरीक्षक राहुरी विभाग, भरारी पथक श्रीरामपूर २ अशा पाच पथकांनी कारवाई केली.
विरगावफाटा, धामोरी फाटा, हिवरगाव आंबरे, राजूर, केळंगण, निंब्रळ, निळवंडे, या ठिकाणी छापे टाकून सात आरोपी, २५८ बल्क लिटर देशी दारू, १० लिटर विदेशी असा १ लाख ९ हजार ८५० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. मात्र ही अवैध दारू कोठून येते? त्या बॅच नंबरप्रमाणे कारवाई होणार का? हा प्रश्न आहे.
संगमनेर उत्पादन निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे, कृष्णा सुळे, प्राची देखणे, अनिल मेंगाळ, सुशांत कासुळे, विमल घोलप यांनी कारवाईत भाग घेतला.
हेरंब कुलकर्णी व दारू बंदी तसेच अवैध दारू विक्री विरोधी समितीच्या मागणीनुसार राज्याचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, उपायुक्त सागर धोमकर जिल्हा अधीक्षक प्रमोदकुमार सोनोने, उपाधिक्षक प्रविण कुमार तेली यांनी अकोले तालुक्यातील अवैध दारू व विक्रेते यांच्याकडे विशेष लक्ष दिल्याने आता दररोज अशी पथके कारवाई करणार असल्याचे वरिष्ठांनी संकेत दिले आहेत.
Breaking News: llegal liquor worth more than Rs 1 lakh seized in Akole