Home जळगाव अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खून

अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खून

Breaking News | Jalgaon Crime: अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना.

person was stoned to death due to an immoral relationship

चोपडा | जळगाव : अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना चोपडा शहरात घडली आहे. दरम्यान घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासातच मारेकरी संशयितास गोरगावले रोड परिसरातून ताब्यात घेतले. सदरची घटना २३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.

जळगावच्या चोपडा शहरातील चोपडा शहरातील पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेवून हत्या झाल्याची घटना घडली आहे. घटनेतील मयताचे वय अंदाजे ४० वर्ष असून मयत हा कचरा गोळा करणारा व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित राजेश काशीराम बारेला (वय ३३) व याच्यासह अन्य एक महिला भंगार व कचरा वेचण्याचे काम करतात. रात्री दोघे शहरातील अल्पबचत भवनजवळ रहिवास करीत होते.

दगडाने डोक्यात वार

दरम्यान शुक्रवारी रात्री त्याच ठिकाणी अज्ञात व्यक्ती आला. यानंतर अज्ञात व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून राजेश बारेला याने संतापाच्या भरात अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर राजेश बारेला व महिला हे दोघेही तेथून निघून गेले होते. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.संशियीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Breaking News: person was stoned to death due to an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here