Home पुणे गाडीत बसवून लॉजवर नेलं, नानासाहेबाचे ३७ वर्षीय महिलेशी जबरदस्ती संबध, व्हिडियो काढले...

गाडीत बसवून लॉजवर नेलं, नानासाहेबाचे ३७ वर्षीय महिलेशी जबरदस्ती संबध, व्हिडियो काढले अन…

Breaking News | Pune Crime: एका 40 वर्षीय नराधमाने 37 वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.

40-year-old man sexually assaults 37-year-old woman

पुणे : एका 40 वर्षीय नराधमाने 37 वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला.

ही घटना बिबवेवाडी भागात घडली असून, पीडित महिलेने अखेर धैर्य एकवटून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानासाहेब (पूर्ण नाव पोलीस तपासात) गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेला वारंवार त्रास देत होता. त्याने तिला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत तिच्यावर मानसिक दबाव निर्माण केला.

एका दिवशी आरोपीने पीडितेला धमकी दिली की, जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन फिनेल पिऊन आत्महत्या करेन. या धमकीने घाबरलेली पीडिता आरोपीच्या गाडीत बसून लॉजवर गेली, जिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि पुढे याच गोष्टींचा आधार घेऊन तिच्यावर दबाव टाकू लागला की, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवीन’.

या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने अखेर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेबविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक  तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Breaking News: 40-year-old man sexually assaults 37-year-old woman,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here