Home नाशिक प्रेमविवाहानंतर धर्मांतरासाठी बळजबरी, धक्कादायक प्रकरण

प्रेमविवाहानंतर धर्मांतरासाठी बळजबरी, धक्कादायक प्रकरण

Breaking News | Nashik Crime: पीडित महिलेने कोर्ट मॅरेजद्वारे विवाह केला असतानाही तिच्यावर गर्भवती असताना धर्म बदलण्याचा दबाव.

case of forced conversion after love marriage

नाशिक- प्रेमविवाह केल्यानंतर एका महिलेवर धर्मांतरासाठी बळजबरी करण्याचा धक्कादायक प्रकार अंबड व सातपूर परिसरात समोर आला आहे. पीडित महिलेने कोर्ट मॅरेजद्वारे विवाह केला असतानाही तिच्यावर गर्भवती असताना धर्म बदलण्याचा दबाव टाकण्यात आला. या प्रकरणी संशयित पती रमजान जलिल शेख याच्यासह सहा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान शेख याला अटक करण्यात आली आहे.

जीवे मारण्याची धमकी

संशयित रमजान शेख याने पीडितेला लग्नापूर्वी तिच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २०१९ मध्ये कोर्ट मॅरेजनंतर पीडिता गर्भवती राहिल्यावर तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नकार दिल्यावर रमजान व त्याच्या कुटुंबीयांनी तिचा छळ सुरु केला.

अंबड पोलिसांनी रमजान शेख, त्याची आई नसिम शेख, भाऊ जमिर, समीर, हुजेर शेख आणि बहिण निलोफर शेख (तिचा नवरा शकील शेखसह) यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बागूल तपास करीत आहेत.

२०२० मध्ये सारडा सर्कल परिसरात रस्त्यात अडवून रमजानने चॉपर दाखवत तिला वडिलांची मालमत्ता नावावर करण्याचा दबाव टाकला. मुस्लिम धर्म न स्वीकारल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या गरोदरपणात तिचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला गेला.

Breaking News: case of forced conversion after love marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here