संगमनेर तालुक्यात या परिसरात पावसाचा हाहाकार, रोडवर झाडे कोसळली, तर कुठे बस अडकल्या…
Breaking News | Sangamner Rain Update: साकूरसह परिसरात मुसळधार पावसाने धूमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह अक्षरशः परिसर पावसाने झोडपून काढला.
संगमनेर: तालुक्यातील साकूरसह परिसरात मुसळधार पावसाने धूमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह अक्षरशः परिसर पावसाने झोडपून काढला आहे. आज सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने एकच धांदल उडाली. साकूर – मांडवा रोडवर झाड कोसळल्याने रस्ताच बंद झाला आहे. तसेच काही ठिकाणी पत्रे उडाले तर झाडे देखील उन्मळून पडली आहे. तसेच शेतात अक्षरशः तळ्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विजेचा तारा देखील काही ठिकाणी तुटून पडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
तसेच साकूर – संगमनेर रोडवर देखील झाड कोसळले होते. साकूर – रोडवर झाड कोसळल्याने काही काळ हा महामार्ग बंद होता. त्यामुळे सर्व वाहतूक बिरेवाडी मार्गे चालू झाली. अरूंद रस्ता तसेच रस्त्याची दयनीय अवस्था बघता वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
दरम्यान कल्याण – साकूर – म्हैसगावकडे जाणारी व पारनेर – साकूर – हिवरगाव साकूरकडे येणारी मुक्कामी बस साकूर – मांडवा रोड बंद असल्याने बिरेवाडी मार्गे बसचालकांनी नेली. मात्र बिरेवाडीवर साकूरकडे येणारी एक आयशर एका बाजूला खचल्याने अक्षरशः वाहतूक ठप्प झाली.
त्यामुळे दोन्ही मुक्कामी बस देखील अडकून पडल्या. त्यामुळे बस मधील प्रवाशांची अक्षरशः हाल झाली. कारण कल्याण बसने म्हैसगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे इतर खाजगी वाहनांनी त्यांना जावे लागले. मात्र या वादळी पावसाने शेतकऱ्यांने प्रचंड नुकसान झाले आहे.
मे महिन्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाद्वारे सुरूवात केल्यानंतर 1 जूनपासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला. मात्र, दोन दिवसापासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होताना दिसत असून येत्या 8 जूनपर्यंत भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. दरम्यान, दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्रीच्यावेळी उकाड्यात वाढ झाली असून यामुळे पावसासाठी पोषण तयार होताना दिसत आहे.
Breaking News: Heavy rains in this area, trees fell on the road