अहिल्यानगर: बनावट ग्राहक पाठवून हॉटेलवर छापा, ३ महिला…..
Breaking News | Ahilyanagar Crime: हॉटेल राजयोग येथे महिलांकरवी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त पिटा कायद्यांतर्गत केली कारवाई.
अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड रोडवरील खंडाळा शिवारातील हॉटेल राजयोगवर छापा टाकून एलसीबीच्या पथकाने पिटा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय अनिल कर्डिले (वय २५, रा. खंडाळा व नारायण ठानप्रसाद भट्टराई (रा. नेपाळ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटुराई याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
अक्षय अनिल कर्डिले हा त्याच्या हॉटेल राजयोग येथे महिलांकरवी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक हॉटेलवर धाडले. खात्री पटल्यानंतर हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात ३ महिला आढळून आल्या. त्यांनी
अक्षय अनिल कर्डिले याने आपणास या ठिकाणी आणल्याची कबुली दिली. आरोपी अक्षय अनिल कर्डिले याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. मपोकॉ. सारिका नारायण दरेकर यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोसई, तुषार धाकराव, पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, अरुण गांगर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, भगवान थोरात, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Breaking News: Hotel raided by sending fake customers, 3 women