Breaking News Sangamner Fire: खत निर्मिती प्रकल्पाशी संबंधित शेडला शुक्रवारी (दि. १३ अचानक आग लागली.
संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोत वीज निर्मिती आणि खत निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित आहेत, यातील खत निर्मिती प्रकल्पाशी संबंधित शेडला शुक्रवारी (दि. १३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. यात प्लास्टिक आणि इतरही वस्तू जळून मोठे नुकसान झाले. शेडचे आणि मशिनरीचे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाहीत.
कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे संगमनेर खुर्द ग्रामपंचायत आणि लगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आग लागल्यानंतर प्रदूषण होते. यापूर्वी अनेकदा कचरा डेपोला आग लागली होती, असेही काही ग्रामस्थांनी सांगितले.
मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्यासह नगर परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. संगमनेर नगर परिषद, अकोले नगर परिषद आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग लागलेल्या ठिकाणी पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू होते.
Breaking News: Fire in shed at garbage depot