Home पुणे बापच बनला शैतान! पोटच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

बापच बनला शैतान! पोटच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

Breaking News | Shirur Crime:  40 वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

Rape of 14-year-old girl in the womb

शिरूरः रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे तुळजापूरहून उदरनिर्वाहासाठी आलेल्या 40 वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर ही गोष्ट कोणाला सांगू नये, यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूरहून एक 40 वर्षीय व्यक्ती त्याची पत्नी व मुलीसह रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त आला होता. काही दिवसांपूर्वी पत्नी कामानिमित्त बाहेर गेलेली असताना त्या नराधमाने स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला, परंतु नराधम आरोपीने हा प्रकार जर कोणाला सांगितला तर दोघींनाही जिवे मारून टाकील, अशी धमकी दिली. परंतु आईने धाडस करून रांजणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या नराधमाला अटक केली. त्याला शिरूर न्यायालयात हजर केलेले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Breaking News: Rape of 14-year-old girl in the womb

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here