प्रेमीयुगुलांचा मृतदेह, विष प्राशन करून आत्महत्या
Breaking News | Pune Crime: प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना.
पुणे : पुण्यातील खडकवासला परिसरात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 11 जुलै रोजी शुक्रवारी उघडकीस आली. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या एका जंगलात या प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करत टोकाचं पाऊल उचललं आहे. याचं कारण आता समोर आलेलं आहे. आत्महत्या केलेले प्रेमीयुगुल हे गेली तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीनेच पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी फिर्यादीत त्यांच्या 16 वर्षीय बहिणीला क्लासला सोडण्यात आलं होतं, मात्र क्लास संपल्यानंतर ती घरी परतली नसल्याने तिच्या बहिणीने वनवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका संशयित मुलाचा देखील तपास केली. तो मुलगा मूळचा आहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती समोर आली. यावेळी पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला असता, मोबाईल बंद असल्याची माहिती समोर आली. खडकवासला परिसरातील धरणाजवळ असणाऱ्या जंगलात 2 मृतदेह आढळल्याने उत्तमनगर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. विषप्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आलीय.
गेली तीन वर्षे दोघेही एकमेकांच्या प्रेमात प्रचंड बुडाले होते. मात्र, दोघांच्याही घरातून विवाहासाठी विरोध दर्शवल्याने त्यांनी आपलं जीवन संपवलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, मृत तरुणीला तिच्या बहिणीने 3 अव्हेन्यु चौकात सोडले होते. क्लास संपल्यानंतर ती घरी कधीच परतली नाही. तिचा शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही, त्यामुळे तरुणीच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिचा शोध घेण्यासाठी त्यांनी मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधत चौकशी केली. तिचा शोध घेण्यासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क केला. संतोष कळसाईत यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्याचा मोबाईल बंद लागल्याची माहिती समोर आली. मृत तरुणाच्या मूळ गावी पोलिसांनी संपर्क केला असता, त्याचा मोबाईल काही वेळ बंद असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. पोलीस त्या संबंधित दोघांचा तपास करत आहेत.
Breaking News: Couple’s bodies found, suicide by consuming poison