अहिल्यानगर: कुजलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळला
Breaking News | Ahilyanagar: ३० ते ३५ वर्षांचा अज्ञात तरुण, कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहराजवळ खैरीनिमगाव व भैरवनाथनगर शिवारात अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तपास सुरू झाला आहे.
भैरवनाथ बनाजवळ खोल खड्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळू शकलेला नाही. तरुणाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षांदरम्यान आहे. रस्त्याच्या कडेला आतील बाजूस झाडाझुडूपामध्ये मृतदेह आढळून आला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती. रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही बाब
समजली. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पँट त्याने घातलेली आहे. मृतदेहाच्या चेहऱ्याची अतिशय वाईट अवस्था असल्याने ओळख पटवण्यास अडचण येत आहे. रविवारी रात्री उशिरा मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.
मृतदेहाचा उग्र वास सुटलेला होता. पोलिस तांत्रिक माहितीच्या आधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Breaking News: body of a young man was found in a decomposed state