Home संगमनेर कत्तलखाने आरोपीबाबत मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार का- आ खताळ

कत्तलखाने आरोपीबाबत मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार का- आ खताळ

Breaking News | Sangamner: पुन्हा एकदा गृहमंत्र्यांचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच कडक कारवाईसाठी कायद्यात काही तरतुदी करून बदल केला जाईल.

Will action be taken against those who gave wrong information Amol Khatal

संगमनेर:   संगमनेरमध्ये अवैध कत्तलखाने सुरू पोलीस अधिकाऱ्यांकडून एका आरोपी वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करणार का  तसेच अवैध कत्तलखाने सुरू असलेल्या पोलीस  अधिकार्याना जबाबदार धरून कारवाई होणार का असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये उपस्थित करत पुन्हा एकदा गृहमंत्र्यांचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच कडक कारवाईसाठी कायद्यात काही तरतुदी करून बदल केला जाईल,

संगमनेर शहरातील अवैधरित्या सुरू असणाऱ्या कत्तलखान्याबाबत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्या कडून राज्याच्या मुख्यमंत्र्याना खोटी माहिती देण्यात आली होती  सर्व माहिती  खोटी अन दिशाभूल करणारी असल्याचे  आ.अमोल खताळ यांनी  सभागृहाच्या निदर्शनास आणून देत ज्या अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहितीसादरकेली   त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?तसेच अवैध कत्तलखाने सुरू असलेल्या पोलीस हद्दीतील अधिकार्याना जबाबदार धरून कारवाई होणार का?असे एकामागे एक प्रश्न उपस्थित करत या महत्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा आमदार अमोल खताळ यांनी गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच कडक कारवाईसाठी कायद्यात काही तरतुदी करून बदल केला जाईल, ,ज्या ठिकाणी अवैध कत्तल खाने सुरू आहेत त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुख  अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले जातील असे हि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

Breaking News: Will action be taken against those who gave wrong information Amol Khatal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here