मोटारसायकल व अल्टोचा भीषण अपघात, सात जण ठार
Breaking News | Dindori Accident: मोटरसायकल व अल्टो यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, यात सात जण ठार झाले.
नाशिक – दिंडोरी येथे मोटरसायकल व अल्टो यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, यात सात जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष व एका लहान बालकाचा समावेश आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, मयत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील आहेत.
माहिती अशी की, अपघातातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेलेले होते. ते परत त्यांच्या गावी जात असताना सदरचा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील लोकांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
दरम्यान, या अपघातात स्पोर्ट्सबाईकवरील दोघेजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर याप्रकरणी पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक शेगर करीत असून, घटनास्थळी माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
अपघातातील मृतांची नावे
१) देविदास पंडित गांगुर्डे (वय -२८ रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) २) मनीषा देविदास गांगुर्डे, (वय -२३ वर्षे, रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक) ३)उत्तम एकनाथ जाधव, (वय – ४२ वर्षे रा- कोशिंबे, ता दिंडोरी, जिल्हा – नाशिक) ४) अल्का उत्तम जाधव, (वय – ३८ वर्षे रा. कोशिंबे ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक) ५)दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय – ४५ वर्षे रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) ६)अनुसया दत्तात्रय वाघमारे, (वय – ४० वर्षे रा देवपूर, देवठाण ता – दिंडोरी, जिल्हा – नाशिक) ७) भावेश देविदास गांगुर्डे, (वय – ०२ रा. सारसाळे, ता दिंडोरी, जिल्हा- नाशिक)
जखमींची नावे
१) मंगेश यशवंत कुरघडे, (वय-२५) २) अजय जगन्नाथ गोंद (वय -१८ वर्षे) रा. नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
Breaking News: Seven killed in horrific accident involving motorcycle and Alto