अहिल्यानगर: एकाची कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: इंडस्ट्रीज जी-१०७ च्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या.
अहमदनगरमधील बोलेगाव येथील सुभाष मालू नेटके नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीने बुधवार, १६ जुलै रोजी राजेंद्र इंडस्ट्रीज जी-१०७ च्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
राजेंद्र इंडस्ट्रीज मध्ये बाथरूम मध्ये आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. ही बाब लक्षात येताच त्यांचा मुलगा विकास सुभाष नेटके यांनी त्यांना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात नेले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण सध्या अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Breaking News: One commits suicide by hanging himself in the company