अहिल्यानगर: माजी नगरसेवकावर गुन्हा, जीवे मारण्याचा प्रयत्न
Breaking News | Ahilyanagar Crime: माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महावितरणच्या सहायक अभियंत्यास आणि बाळासाहेब बोराटे यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यास धक्काबुक्की केल्याच्या दोन घटना.
नगरः माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महावितरणच्या सहायक अभियंत्यास आणि बाळासाहेब बोराटे यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यास धक्काबुक्की केल्याच्या दोन घटना गुरुवारी अहिल्यानगर शहरात घडल्या. कोतकरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, तर बोराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न कळविता केडगावच्या लोंढे मळा परिसरात ड्रिस्टीब्युशन बॉक्स बसविल्याच्या रागातून माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर चारचाकी वाहन घातल्याची तक्रार कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आली आहे. केडगाव सबस्टेशनमध्ये बुधवारी ही घटना घडली.
राहुल सीताराम शिलावंत यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ते महावितरणमध्ये सहायक अभियंता आहेत. केडगाव सब स्टेशनमध्ये असताना बुधवारी सायंकाळी त्यांना मनोज कोतकर यांचा फोन आला.
लोंढेमळा, खंडोबा मंदिर येथे ड्रिस्टीब्युशन बॉक्स मला न सांगता, न बोलावता तुम्ही कसा काय बसवला, अशी विचारणा करत त्या कामाचे श्रेय दुसरे लोक घेत असल्याचे ते म्हणाले. फोनवरच त्यांनी शिवीगाळ करण्यास केली. त्यानंतर मनोज कोतकर इनोव्हा कारने सबस्टेशन येथे आले. त्यांनी कार्यालयाबाहेरच भरधाव वेगात कार चालवीत अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Breaking News: Crime, attempt to murder against former corporator