Home महाराष्ट्र पाचशे रुपयांचं अमिष दाखवलं; दोन नराधमांचा 12 वर्षीय मुलीवर अत्याचार

पाचशे रुपयांचं अमिष दाखवलं; दोन नराधमांचा 12 वर्षीय मुलीवर अत्याचार

Breaking News | Satara Crime: .एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Two men rape 12-year-old girl

सातारा: साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे. लालासो यशवंत पवार (वय वर्षे 55) आणि विकास जाधव उर्फ इब्य्रा वय 25 अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशन केले जात आहे. या प्रकरणात रहिमतपूर पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे. या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.

Breaking News: Two men rape 12-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here