Home संगमनेर डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे “एक...

डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे “एक राखी सैनिकांसाठी” कार्यक्रम संपन्न.!

Breaking News | Sangamner:  डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, संगमनेर येथे मागील तीन वर्षांपासून एक राखी सैनिकांसाठी कार्यक्रम. (One Rakhi for Soldiers)

One Rakhi for Soldiers

संगमनेर(प्रतिनिधी): डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, संगमनेर येथे मागील तीन वर्षांपासून एक राखी सैनिकांसाठी हा कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. शाळेचे प्राचार्य श्री. सुनील कुमार शुक्ला सर यांनी मान्यवरांचा सत्कार केला तसेच शाळेच्या प्राथमिक विभागाच्या उपप्राचार्या स्मिता गुंजाळ मॅडम यांनी सुद्धा मान्यवरांचा सत्कार केला. यानंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे संस्थापक श्री.भानुदास पोखरकर तसेच अध्यक्ष मा.श्री प्रकाश कोटकर कार्याध्यक्ष मा.श्री. सुनील थोरात, मा.श्री. संजय रहाणे तसेच सुभेदार मेजर गोकुळ मतकर व कमांडो मा.श्री. लक्ष्मण ढोले सर व मा.श्री. भारत कुटे तसेच लेफ्टनंट मा.श्री. अनिल पावसे, सुभेदार मा.श्री. जी टी घुले, सर हवालदार मा.श्री. बाळासाहेब घुले सर, तसेच मा.श्री माधव काकड सर ,तसेच गोविंद खर्डे सर, सुभेदार मेजर मा.श्री. गिरीश एरंडे सर, हवालदार मा.श्री आनंद गीते सर, वीरपत्नी श्रीमती शारदा थोरात मॅडम व श्रीमती सुनंदा दराडे मॅडम उपस्थित होते., तसेच निवृत्त सैन्य अधिकारी व सैनिक उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी या सर्व शूर वीरांना राखी बांधून व औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेतले व कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. इयत्ता नववीत शिकत असलेल्या कु.अनुष्का गंगासागरे या विद्यार्थिनीने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात ४६ वा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

One Rakhi for Soldiers 2

 

यावेळी संगम सेवाभावी संस्थेच्या संचालिका माननीय सौ.अंकिता श्रीराज डेरे मॅडम, प्राचार्य श्री.सुनील कुमार शुक्ला सर, तसेच उपप्राचार्या (प्राथमिक विभाग) स्मिता गुंजाळ मॅडम या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कोटकर मॅडम व आभार प्रदर्शन संगीता गवांदे मॅडम यांनी केले.

Breaking News: “One Rakhi for Soldiers” program concluded at Dr. Bhanudas G. Dere English Medium School and Junior College, Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here