खळबळजनक! अहिल्यानगर जिल्ह्यातील या देवस्थानचे सध्याचे उप कार्यकारी अधिकारी यांची आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. (Suicide)
अहिल्यानगर: जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली असल्याची बातमी समोर आलीय. शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Breaking News: deputy executive officer of this temple in Ahilyanagar district committed suicide