अहिल्यानगर: कोयत्याचा धाक दाखवून बहिण भावास लुटले, कार रस्त्याच्या कडेला उभी केली अन…
Breaking News | Ahilyanagar Robbery: कारमधून प्रवास करणाऱ्या बहीण-भावाला लुटल्याची आणखी एक घटना.
अहिल्यानगर : नगर-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास कारमधून प्रवास करणाऱ्या बहीण-भावाला लुटल्याची आणखी एक घटना नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारात घडली आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर सुपा आणि नगर तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारे लुटमार करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
याबाबत पराग प्रकाश जाधव (वय ३०, रा. सुभाषवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बहिणीच्या मुलाला नेवासे येथील त्रिमूर्ती विद्यालयात सोडविण्यासाठी फिर्यादी हे त्यांची बहीण कांचन, भाचा कृष्णा यांच्यासह त्यांच्या मित्राच्या कारने या महामार्गावरून नगरमार्गे नेवासे येथे जाण्यासाठी निघाले होते.
पहाटे ४.३० च्या सुमारास नारायणगव्हाण गावच्या शिवारात आल्यावर त्यांच्या वाहनाची हेडलाईट अचानक बंद पडली, त्यामुळे त्यांनी नवले वस्तीजवळील हॉटेल शिवतीर्थसमोर कार रस्त्याच्या कडेला उभी करून थांबले असता, तेथे काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या आरोपींनी फिर्यादी पराग जाधव व त्यांची बहीण कांचन यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याजवळील रोख रक्कम व ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली.
तक्रारदाराचा मोबाईल फोन हिसकावून तोडण्यात आला, त्यानंतर गुन्हेगार दुचाकीवरून पळून गेले. तक्रारदार जाधव यांनी सुपे पोलिसांना घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. पराग जाधव यांच्या तक्रारीवरून तीन दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Brother and sister robbed brother and sister by showing fear of a coyote