Home बीड मनोज जरांगेंचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली

मनोज जरांगेंचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली

Breaking News | Beed Manoj jarange Accident: मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

Manoj Jarange's accident, elevator fell from the first floor

बीड: आज बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. सुदैवाने मनोज जरांगे पाटील सुखरुप बाहेर आले.

बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते. त्यावेळी, अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली. त्यावेळी, या लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्या पडला. मनोज जरांगे यांच्यावर मराठा युवकांसह लाखो कार्यकर्ते प्रेम करतात. त्यामुळे, त्यांची विशेष काळजी देखील घेतली जाते. त्यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा देखील कायम असते. 

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्याच रुग्णाला भेटण्यासाठी जरांगे पाटील रुग्णालयात आले होते. तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये गेले. परंतु, लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक आल्याने ती ओव्हरलोड झाली. त्यामुळे ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली. या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून सुदैवानं जरांगे पाटील यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाही.

Breaking News: Manoj Jarange’s accident, elevator fell from the first floor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here