संगमनेर: पैशाच्या जोरावर काही मंडळी राजकारण करू पाहत आहे, घणाघाती टीकास्त्र माजी मंत्री थोरात
Breaking News | Sangamner: प्रत्येकासाठी तिरंगा ध्वज, देश व राज्यघटना महत्त्वाची आहे, असे सांगत, संगमनेर तालुक्यात दादागिरीसह दहशत वाढते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. पैशाच्या जोरावर काही मंडळी राजकारण करू पाहत आहे, असे घणाघाती टीकास्त्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता सोडले.
संगमनेर: संगमनेर शहरासह तालुक्यात विविध जाती-धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहतात. मानवता हा आपला धर्म आहे, मात्र काही लोक भगवा, हिरवा, निळा असे ध्वज घेऊन जातीभेद निर्माण करू पाहत आहेत.
अशा शक्तींना रोखूण प्रत्येकासाठी तिरंगा ध्वज, देश व राज्यघटना महत्त्वाची आहे, असे सांगत, संगमनेर तालुक्यात दादागिरीसह दहशत वाढते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. पैशाच्या जोरावर काही मंडळी राजकारण करू पाहत आहे, असे घणाघाती टीकास्त्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता सोडले.
संगमनेर खुर्द येथे विविध कामांच्या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, सरपंच श्वेता मंडलिक, उपसरपंच गणेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. थोरात यांनी संगमनेर खुर्दला ‘छोटा भारत’ म्हटले, कारण येथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यांनी भारताच्या विविधतेवर भर दिला आणि सांगितले की, आपली प्राथमिकता तिरंगा ध्वज, देश आणि राज्यघटना असली पाहिजे.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. मोठ-मोठी विकास कामे मार्गी लावली. 9 लाख लिटर दूध उत्पादन घेणारा आर्थिक समृद्ध संगमनेर तालुका बनविला. 40 वर्षे त्यांनी खूप कामे केली.
लोकशाहीमध्ये सत्ता परिवर्तन होत असते. जनतेच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेमध्ये आहे. कोणतेही काम पूर्ण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत, हे सर्वांना माहिती आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने काळजी करू नये. माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाचे कोणतेही काम तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविक डॉ. रविंद्र गुंजाळ, सूत्रसंचालन काशिनाथ गुंजाळ, तर सुभाष गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची मिरवणूक काढून अनोखे स्वागत केले.
Breaking News: do politics with the power of money, says former minister Balsaheb Thorat