Home संगमनेर संगमनेर: बदनामीचे यूट्यूब चॅनेलवर प्रसारण थांबविण्यासाठी चार लाखांची खंडणी

संगमनेर: बदनामीचे यूट्यूब चॅनेलवर प्रसारण थांबविण्यासाठी चार लाखांची खंडणी

Breaking News | Sangamner Crime: एका सेवाभावी संस्थेच्या बदनामीचे यूट्यूब चॅनेलवर प्रसारण थांबविण्यासाठी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती चार लाख रुपये देण्याचे ठरले. 

Demand for ransom of Rs 10 lakh to stop broadcasting of defamation on YouTube channel

संगमनेर : तालुक्यातील वडगाव पान येथील एका सेवाभावी संस्थेच्या बदनामीचे यूट्यूब चॅनेलवर प्रसारण थांबविण्यासाठी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती चार लाख रुपये देण्याचे ठरले. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने संस्थेचे कामकाज पाहणाऱ्या युवकाला अकोले येथे बोलावले. याप्रकरणी बुधवारी (दि. ६) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकोले येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

साळवे (रा. अकोले) पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही, यांच्याविरुद्ध वडगाव पान (ता. संगमनेर) येथील दत्त धाम सरकार,

दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेचे कामकाज पाहणाऱ्या शिवम राजेंद्र गडगे (वय २१, रा. वडगाव पान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. २०२४ पासून ते ६ ऑगस्टपर्यंत हा प्रकार घडला.

दत्त धाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेमध्ये येऊन तेथील संस्थेचे, भाविकांचे व्हिडीओ आणि ऑडिओ काढून ते एका यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करून संस्थेच्या नावाची बदनामी केली. वारंवार फोन करून सदर क्लिप प्रसारमाध्यमात प्रसारित करून बदनामीचे प्रसारण थांबवायचे असेल तर दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, तडजोडीअंती बुधवारी (दि. ६) चार लाख रुपये द्यायचे ठरल्यानंतर साळवे याचे अकोले येथील कार्यालयात बोलावले, असेही गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Breaking News: Demand for ransom of Rs 10 lakh to stop broadcasting of defamation on YouTube channel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here