अकोले: वेशांतर करून मित्रानेच मित्राच्या घरी केली चोरी
Breaking News | Sangamner: वेशांतर करून मित्राच्या घरी चोरी करणाऱ्यास राजूर पोलिसांनी चोवीस तासात गजाआड केले.
अकोले : मित्राच्या गळ्यात सोन्याची चेन पाहिली अन् त्याची नियतच फिरली. वेशांतर करून मित्राच्या घरी चोरी करणाऱ्यास राजूर पोलिसांनी चोवीस तासात गजाआड केले. त्याच्याकडून चोरलेल्या साडेचार लाख रुपयांच्या दोन चेन पोलिसांनी हस्तगत केल्या. मौज मजा करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
सागर दिगंबर पवार (रा. राजूर) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने मित्र विष्णू रामभाऊ हेकरे याच्याच घरात रविवारी मध्यरात्री चोरी केली होती.
हेकरे हे रात्री झोपले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास दरवाजावर थाप मारल्याने त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी तोंडाला कपडा बांधलेला तरूण घरात शिरला. हेकरे यांना ढकलत त्याने स्वयंपाक घरात नेले. हेकरे यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्याची चेन हिकावून पळ काढला. हेकरे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी तपासाची चक्र फिरवली. खबऱ्या आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत सागर पवार यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरलेल्या ४ लाख ३९ हजार रुपयांच्या सोन साखळी पोलिसांनी जप्त केली.
आरोप सागर पवार व फिर्यादी विष्णू हेकरे हे चांगले मित्र आहेत. विष्णूच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून सागरची नियत फिरली. नशेत त्याने रात्री हेकरे यांच्या घरी चोरी केली. चोरीसाठी त्याने वेशांतर केले होते. मौज मजेसाठी त्याने ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
Breaking News: A friend disguised himself and stole from a friend’s house