Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मुळानदी पात्रात आढळला मृतदेह

अहिल्यानगर: मुळानदी पात्रात आढळला मृतदेह

Breaking News | Ahilyanagar: मुळानदीच्या पुलाजवळील नदीपात्रातील पाण्यात कोंढवड या इसमाचा मृतदेह आढळून आला.

Body found in Mulanadi river

कोंढवड: राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील मुळानदीच्या पुलाजवळील नदीपात्रातील पाण्यात काल सकाळी संजय बाबुराव शिरसाट (वय ३८) रा. कोंढवड या इसमाचा मृतदेह आढळून आला.

काल सकाळी कोंढवड येथील पुलावरून गावातील जाणाऱ्या येणाऱ्या

ग्रामस्थांना नदीपात्रात संजय शिरसाट या इसमाचा मृतदेह पाण्यात दिसला. ही बातमी समजताच गावातील काही तरूणांनी नदीकडे धाव घेऊन तो मृतदेह बाहेर काढला. या घटनेबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली असता.पो.हे.कॉ. संभाजी बडे, जयदीप बडे व पो.कॉ. नवले यांनी घटनास्थळी

धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत संजय शिरसाट यांच्या पश्चात आई, बहीण, पत्नी, भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. संजय शिरसाट यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Breaking News: Body found in Mulanadi river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here