त्यांनी दहा वर्ष काय केलं?; ना. विखे यांचा सवाल
Breaking News | Radhakrishna Vikhe Patil: कारखानदारीच्या मुद्यावरून “जनाची नाही तर मनाची ठेवा” असा टोला लगावल्यामुळे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आहे असा समज पसरला.

अहिल्यानगर: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखानदारीच्या मुद्यावरून “जनाची नाही तर मनाची ठेवा” असा टोला लगावल्यामुळे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आहे असा समज पसरला होता.
या गैरसमजाला छेद देत विखे पाटील म्हणाले, मी अजित पवारांवर टीका केलेली नाही. माझा सवाल जाणत्या राजांकडे (शरद पवार) होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते आम्हाला घेऊन फिरत, आयकर माफी व इथेनॉल धोरणाचे आश्वासन देत होते. मात्र मंत्रीपदावर राहूनही त्यांनी ना आयकर माफी दिली, ना इथेनॉल धोरण आणलं. मग त्यांनी दहा वर्ष काय केलं, हा माझा प्रश्न आहे.
७९ व्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात ना. विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, आमच्या सरकारने आज इथेनॉल धोरण आणले असून १५ हजार कोटी रुपयांची आयकर माफी दिली आहे. आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करत आहोत. पण भूतकाळात जाणत्या राजांनी तसे काही केले नाही. म्हणूनच मी जनाची नाही तर मनाची ठेवा असं म्हटलं होतं.
यावेळी त्यांनी इतरही मुद्यांवर प्रतिक्रिया दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मांसबंदी निर्णयाबाबत ते म्हणाले, “हा नॉन-इशू असून विरोधकांकडे करण्यासारखं काहीच शिल्लक नसल्यामुळे ते अशा मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत. आरोप-प्रत्यारोपाऐवजी त्यांनी गरीब मुलं दत्तक घेऊन चांगलं काम करावं.”
Breaking News: What did they do for ten year Radhakrishna Vikhe Patil
















































