Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कोयत्याने तरुणावर हल्ला; माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: कोयत्याने तरुणावर हल्ला; माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा

Breaking News | Ahilyanagar Crime: राजकीय वादातून कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना.

young man was attacked by a coyote Crime against nine people including a former corporator

अहिल्यानगर : राजकीय वादातून कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि. १४) रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जीपीओ चौकात घडली. अबुताला अकिल शेख (२४, रा. इब्राहीम कॉलनी, जीपीओ चौक) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊजणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.

नजीर अब्दुलरज्जाक जहागिरदार ऊर्फ नज्जू पहिलवान, इम्रान बशीर जहागिरदार, इम्तियाज जहागिरदार ऊर्फ आर. डी. एक्स, रशीद अब्दुल जहागीरदार ऊर्फ रशिक दंडा, अकीब रशीद जहागीरदार, अश्रफ नदिम जहागीरदार, फैजान निसार जहागीरदार, जिशान इम्तियाज जहागीरदार (सर्व झेंडीगेट, अहिल्यानगर), मोईन अलम जहागीरदार) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत.

Breaking News: young man was attacked by a coyote Crime against nine people including a former corporator

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here