Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर तरूणाकडून अत्याचार

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर तरूणाकडून अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीवर (वय 12) सहा महिन्यांपासून वेळोवेळी अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ahilyanagar Crime Minor girl raped by youth

अहिल्यानगर: तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर (वय 12) सहा महिन्यांपासून वेळोवेळी अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाळु भारत निकम (रा. विळद पाण्याची टाकी, ता. अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने यासंदर्भात शनिवारी (16 ऑगस्ट) दुपारी फिर्याद दिली आहे.

माहिती अशी की, फिर्यादी मुळची राहुरी तालुक्यातील एका गावची रहिवासी असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे आई-वडील कामावर गेल्याची संधी साधून संशयित आरोपीने मागील पाच ते सहा महिन्यांपासून तिला एकटी असताना जबरदस्तीने वेळोवेळी उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केले. फिर्यादीने विरोध केल्यास किंवा कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. ही घटना 15 फेब्रुवारी 2025 पासून 15 ऑगस्ट 2025 पर्यंत विविध वेळा घडली असून, शेवटी धैर्य एकवटून पीडित मुलीने फिर्याद दाखल केली.

त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व उपनिरीक्षक मोंढे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Breaking News: Ahilyanagar Crime Minor girl raped by youth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here