Home संगमनेर हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण, हे आता जनतेला कळाले, वेळ आल्यास जशास तसे...

हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण, हे आता जनतेला कळाले, वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ..! मंत्री विखे पाटील यांचा थेट इशारा

Breaking News | Sangamner: तशी वेळ आलीच तर मात्र जशास तसे उत्तर देण्याची ताकदही आमच्यात आहे, असा इशारा देतानाच हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण, हे आता जनतेला कळाले आहे, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री थोरात यांचे नाव न घेता हल्लाबोल.

We will answer as and when the time comes Minister Vikhe Patil's direct warning

संगमनेर: आ. खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर अजुनही आमचा संयम सुटलेला नाही. परंतु तशी वेळ आलीच तर मात्र जशास तसे उत्तर देण्याची ताकदही आमच्यात आहे, असा इशारा देतानाच हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण, हे आता जनतेला कळाले आहे, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री थोरात यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.

गणेश उत्सवाच्या खाजगी कार्यक्रमात गुरुवारी आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाला. याच्या निषेधार्थ संगमनेरात महायुतीच्या वतीने शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात आला. या नंतर नवीन नगर रोड येथे आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठलराव लंघे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, जावेद जागीरदार आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मंत्री विखे पुढे म्हणाले की, विरोधकांचा कार्यक्रम करून तालुक्यात दहशतवाद तयार करून लोक पायाजवळ राहिले पाहिजे, असे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव काहींना पचवता आला नाही. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेल कौल मान्य केला पाहिजे. पण काहींना लोकशाहीच मान्य नाही.

त्यातून हल्ल्याच्या घटना घडल्या असून दहशत निर्माण करून आमदारावर हल्ला केला, मात्र तरीही जनता तुमच्या विरोधात उभी राहिल्या शिवाय राहणार नाही. तुमची गुंडागर्दी, दहशती विरोधात आमदार खताळ उभा राहिला आहे. तालुक्यातील जनतेला विकासाकडे घेऊन जात असून दुष्काळी तालुका दुष्काळीमुक्त करण्याचे काम वेगाने सुरू असून तळेगाव, निमोण दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम महायुती शासनाने केल्याचे सांगताना अनेक मुद्द्यांवरून लक्ष्य केले.

अशा घटनांनी लोकशाहीचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही. महायुतीचा कार्यकर्ता आता शांत बसणार नाही. तुमच्या प्रवृत्तीमुळे जनतेने तुम्हाला घरी बसविले, जनतेच्या मनातून तुम्ही उतरला. हल्ल्याची घटना अचानक घडलेली नाही, याचा मागचा खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध पोलीसांनी घेतला पाहिजे. कुचराई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई होणार आहे.

हा नियोजित कट आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे आमदार खताळ वाचले. पारदर्शी या घटनेची चौकशी झाली पाहिजे. काही महिन्यापूर्वी धांदरफळाला हल्ला झाला. तर तालुक्याचा आमदार बदलला या हल्ल्याच्या निषेध करत स्थानिक. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवायचा आहे.

काहींची शेवटच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. मात्र अस्तित्व केवळ दहशत, गुंडा गर्दीतून होत नाही. तालुक्याचे दहशत संपविण्याची माझी जबाबदारी आहे. एका बाजूने दहशत मोडून दुसरीकडे विकास साधायचा आहे. आपण शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. व्यापारी बंधुंनी दहशतवादाला घाबरू नका. आम्ही इथे तालुका दहशतमुक्त करायला आलोय, असे विखे म्हणाले.

Breaking News: We will answer as and when the time comes Minister Vikhe Patil’s direct warning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here