Home नाशिक ‘मेरी गर्लफ्रेंड को छेडता है’: एका आरोपावरून आरोपीचा क्रूर खून

‘मेरी गर्लफ्रेंड को छेडता है’: एका आरोपावरून आरोपीचा क्रूर खून

Breaking News | Nashik Crime: विधिसंघर्षितने एका अनोळखी फिरस्त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा जागीच खून केला.

teases my girlfriend  Brutal murder of accused on one charge

नाशिकः स्मार्ट रोडवरील सीबीएसजवळ मंगळवारी (ता. २) दुपारी विधिसंघर्षितने एका अनोळखी फिरस्त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा जागीच खून केला. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी तिघा विधिसंघर्षितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. सरकारवाडा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

त्र्यंबक नाका सिग्नलपासून काही अंतरावर असलेल्या महाराजा हॉटेलसमोर दुपारी दीडच्या सुमारास अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप मृत फिरस्त्यावर करण्यात आला. त्यावरून विधिसंघर्षित संतापला. ‘मेरी गर्लफ्रेंड को छेडता है…’ असा जाब विचारून त्याने फिरस्त्याशी वाद घातला. वाद चिघळल्याने विधिसंघर्षिताने फुटपाथवरील दगड उचलून फिरस्त्याच्या डोक्यात प्रहार केला. डोक्याला वर्मी घाव बसल्याने फिरस्ता जागीच कोसळला आणि मृत्यू पावला. घटनेच्या वेळी विधिसंघर्षितासोबत त्याचे दोन साथीदार तसेच संबंधित मुलगीही उपस्थित होती.

मुख्य संशयित विधिसंघर्षित आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला त्याने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड मारला होता. त्या वेळी पोलिसांनी तातडीने उपचारासाठी हलविल्याने तो वाचला होता, तर गेल्या आठवड्यातच मुंबई नाका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले होते. इतर दोन्हीही विधिसंघर्षित आहेत.

खून झालेली व्यक्ती अंदाजे ४५ ते ५० वर्षांची असून, त्याचे नाव ‘राम्या’ असल्याचे सांगितले जाते. मात्र पोलिसांकडून अधिकृत खात्री अद्याप झालेली नाही. तो सीबीएस, त्र्यंबक नाका परिसरात भिक्षा मागत भटकत असे. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या आरोपावरून विधिसंघर्षिताने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड व पथक घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही विधिसंघर्षित त्याच ठिकाणी असल्याने पोलिसांनी त्यांना जागेवरच ताब्यात घेतले. ही कारवाई उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, विशाल देवरे, विशाल काटे, नाझीमखान पठाण, योगिराज गायकवाड, मलिंदसिंग परदेशी, उत्तम पवार, रमेश कोळी, महेश साळुंके, धनंजय शिंदे यांच्या पथकाने केली.

Breaking News: teases my girlfriend’: Brutal murder of accused on one charge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here