Home अहिल्यानगर पोलिस ठाण्यात महिलेने घेतले पेटवून, मुलगी गायब झाली अन….

पोलिस ठाण्यात महिलेने घेतले पेटवून, मुलगी गायब झाली अन….

Breaking News | Ahilyanagar:  सुपा पोलिस ठाण्यात आलेल्या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी पुण्याला हलवले.

Woman sets fire to police station, daughter disappears

सुपा : एका गुन्ह्याच्या निमित्ताने सुपा पोलिस ठाण्यात आलेल्या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने धाव घेत आग विझवली, मात्र तोपर्यंत आगीत होरपळल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने नगरला व नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले. स्वाती प्रकाश दरेकर (मूळ रा. न्हावरा, ता. शिरूर, पुणे) असे या जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी स्वाती दरेकर यांची मुलगी गायब झाली होती. याबाबत सुपा पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात ही मुलगी आळंदीत सापडली. पोलिसांनी तिला अहिल्यानगर येथील वन स्टॉप सेंटर येथे ठेवले होते. मात्र, तिला आपल्या ताब्यात द्यावे, अशी तिच्या आईची मागणी होती. मात्र, ही मुलगी तिच्या आईकडे जाण्यास तयार नव्हती. मंगळवारी (२ सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सुपा पोलिस ठाण्यात आलेल्या स्वाती दरेकर यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेत, आग विझवली. मात्र, तोपर्यंत आगीत होरपळ्याने ही महिला गंभीर जखमी झाली होती.

तिला तातडीने नगरला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोना बाळासाहेब मासाळकर यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संपत खैरे करीत आहेत.

Breaking News: Woman sets fire to police station, daughter disappears

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here